पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०३) गोविंद व धाकट्याचे म्हणजे आपल्या चारत्रनायकांचे नांव गोपाळ. गोपाळा बारा वर्षांचा असतांच त्याचे वडील मरण पावले. त्यामुळे कुटुं- बावर मोठाच कठीण प्रसंग आला. तरी धीर धरून गोपाळरावांचे वडील बंधु गोविंदराव यांनी कुटुंबाचा सर्व भार आपल्या डोक्यावर घेतला. कुटुंबपोषणासाठी व लहानग्या गोपाळाचें शिक्षण नीट व्हावे म्हणून गोविंदरावांनी पुढे जास्त शिकण्याची आपली हौस सोडून दिली व एक लहानशी नोकरी धरली. गोविंदरावांचें गोपाळरावांवर फारच प्रेम होतें. आपला गोपाळ शिकून जगांत पुढे यावा, त्यानें आपल्या घरा- ण्याचें नांव काढावें असें गोविंदरावांना वाटत असे. व हा अर्से नांव काढील अशी गोविंदरावांना खात्री होती. गोपाळरावही गोविंदरावांना फार मान देत व त्यांच्या आज्ञेत वागत. गोविंदराव आपल्या लहानशा पगारांत सर्व कुटुंबाचा खर्च भागवून शिवाय गोपाळरावांच्या शिक्षणा- साठींही ते मदत करीत असत. गोपाळरावांचे बालपणाचा मजेचा काळ कागल व कोल्हापूर येथें गेला. गोपाळरावांचें शिक्षणही कागल व को- ल्हापूर येथें झालें. गोपाळराव कोल्हापूर येथील राजाराम हायस्कुलांत इंग्रजी शिकले. त्या हायस्कूलमधून त्यांची मॅट्रिक्युलेशनची परीक्षा स १८८१ साली झाली. तेव्हां ते अवघे पंधरा वर्षांचे होते. सोळा वर्षे पुरीं होईपर्यंत मट्रिकला बसूं यावयाचें नाहीं हा नियम त्या वेळेला झाला नव्हता म्हणून बरें, नाहीं तर गोपाळरावांचें एक वर्ष विनाकारण फुकट गेलें असतें. मॅट्रिक्युलेशनची परीक्षा सन १८८१ सालीं पास झाल्यावर गोपाळराव कोल्हापूर येथें असलेल्या राजाराम कॉलेजांत शिकूं लागले. राजाराम कॉलेजमधून सन १८८२ सालीं ते प्रीव्हियसची परीक्षा पास झाले. नंतर ते पुण्यास डेक्कन कॉलेजांत गेले व डेक्कन कॉलेजमधून सन १८८३ सालीं ते फर्स्ट बी. ए. ची परीक्षा पास झाले. नंतर मुंबई येथें एल्फिन्स्टन कॉलेजांत गेले व त्या कॉलेजांतून सन १८८४ सालीं बी. ए. ची परीक्षा सेकंड क्लासांत पास झाले. ते कॉलेजांत असतांना अगदीं