पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारत सेवक ना. गोपाळ कृष्ण गोखले. 1999 बाळांनों, आतांपर्यंत मीं तुम्हांला न्या. माधवराव रानडे, मालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर, प्रि. गोपाळ गणेश आगरकर व लो. बाळ गंगाधर टिळक यांचीं चरित्रे म्हणजे महाराष्ट्राच्या पंचप्राणांपैकीं चार प्राणांची हकीगत आतांपर्यंत तुम्हांला सांगितली. आतां ज्याला हिंदुस्तानचा सेवक म्हणवून घेण्यांत अतिशय आनंद वाटत असे, ज्यानें सरकार सर हा किताब देत असतां मला तो नको असे म्हणून सर या पदवीपेक्षां हिंद देवीचा सेवक ही पदवी आपणाला जास्त आवडते असे स्पष्ट करून दाखविलें, ज्याला स्टेट सेक्रेटरीच्या कौन्सिलचा पहिला सभासद होण्याचा मान मिळत असतां ज्यानें तो नको अर्से म्हणून भारतमातेचा सेवक होण्यांतच आपणाला अधिक धन्य मानून घेतलें, ज्यानें लो. टिळक व प्रि० आगरकर यांच्या खटल्याचा खर्च अंशतः आपल्याला देतां यावा म्हणून नाटकांतही काम केलें व ज्यानें त्या थोर पुरुषांचें उदाहरण डोळ्यांपुढे दिसतांच केवळ अठराव्या वर्षी देशसेवेचें कंकण करांत बांधले त्या निस्सीम देशभक्त भारतसेवक ना. गोपाळ कृष्ण गोखल्यांचें पवित्र चरित्र मी तुम्हाला आतां सांगणार आहे. जन्म व बाळपण. ना. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यांत चिपळूण तालुक्यांत ताम्हनमळा या खेड्यांत सन १८६६ त झाला. गोपाळरावांचे वडिलांची बरीच गरीबी होती. त्यांना कोल्हापुर जवळ कागल म्हणून एक संस्थान आहे त्या संस्थानांत एक लहानशी नोकरी होती. आपल्या अल्पप्राप्तीवर समाधानानें व ठाकठिकीन ते उदरनिर्वाह करीत असत. त्यांना दोन मुलगे होते. वडील मुलाचें नांक