पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०१ ) दुःखित होऊन क्षत्रिय कुलावतंस छत्रपती कोल्हापूर सरकार, जगद्गुरु शंकराचार्य, शेट बमनजी, न्या. चंदावरकर, श्री. रमाबाईसाहेब रानडे यांसारख्या थोर माणसांपासून तो अत्यंत गरीब माणसापर्यंत हजारों लोकांनी सहानुभूतीच्या तारांचा व पत्रांचा लो. टिळकांच्या पुत्रांवर सारखा वर्षाव केला. सर्व देशांतील वर्तमानपत्रांनी त्यांच्या गुणवर्णनपर लेखळालेहिले. थोर इंग्रज, स्कॉच, अमेरिकन स्त्रीपुरुषांनी सहानुभूतीचीं पत्र पाठविलीं. पुणे व प्रयाग येथें लो. टिळकांच्या अस्थींची जंगी जाहीर मिरवणूक लोकांनी व पुढान्यांनी काढली. शेंकडों रीतीनें लोकांनी लोकमान्यांवरचें आपलें प्रेम व्यक्त केलें. असो; याप्रमाणे लोकमान्य टिळक आपला नाशवंत देह टाकून अजरामर झाले. बाळांनो, ऐकलेतना लोकमान्य टिळकांचें दिव्यचरित्र. यावरून तुम्हीं हैं शिकावें कीं, १ आपले सर्व आयुष्य सत्कार्यात व देशसेवेंत खर्च करावें. एक क्षणही आळसांत घालवूं नये. २ हातांत घेतलेलें काम कितीही संकटें आलीं तरी नेटानें तडीस न्यावें. ३ मित्रकार्याकरितां जिवापाड झटावें. ४ स्वदेशाप्रमाणें स्वधर्मावर प्रेम करावें रोज धर्मविचारांत थोडा तरी वेळ खर्च करावा. ५ विद्या शिकण्यांत सर्व वेळ न घालवितां शरीर पिळदार व कंटक बनविण्यासाठी व्यायाम व धांव- पळीचे खेळ खेळण्यांत रोज कांहीं वेळ दिलाच पाहिजे, ६ नुसते पुस्तकी पंडित न होतां पुस्तकी पंडित व हातोडीबहाद्दरही व्हावें. ७ आपला स्वभाव तेजस्वी व बाणेदार बनवावा. ८ गर्वाला मुळींच थारा देऊं नये. ९ आपली रहाणी अगदी साधी असावी. १० स्वतःचें नुकसान सोसूनही देशकार्य करावें. ११ पूर्वजांविषयीं व आ- पल्या पूर्वीच्या इतिहासाविषयीं योग्य आभिमान बाळगावा. १२ आपले वर्तन अत्यंत पवित्र व शुद्ध ठेवावें. १३ विद्येशिवाय दुसरें कसलेंही व्यसन लावून घेऊं नये. १४ आपले अंगांत हिंमत अथवा धैर्य आण- ण्याचा प्रयत्न करावा. बाळांनो, याप्रमाणे तुम्ही वागलां म्हणजे तुम्ही सर्वांचे लाडके व्हाल.