पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१००) प्रचंड गर्दीमुळे ट्राम किंवा इतर गाड्या जाणें बंद झालें होतें. एक विमान करून त्यांत टिळकांना मांडी घालून बसविलें होतें. हजारों स्त्रिया प्रेत- यात्रेबरोबर चालल्या होत्या. आकाशांतून पावसाच्या धारा व लोकां- च्या डोळ्यांतून अश्रूधारा सारख्या वहात होत्या. सर्व रस्त्यांवरील सर्व घरांतील सर्व मजल्यांच्या खिडक्या टिळकदर्शनासाठी उत्सुक अशा स्त्रीपुरुषांनी भरून गेल्या होत्या. प्रथम विमान उचलण्याचा मान पुणेकरांस दिल्यानंतर महात्मा गांधी व मुसलमान पुढारी शौकत अल्ली व दुसरे मुसलमान पुढारी अश्रुपूर्ण नेत्रांनीं पुढे आले व 'आम्हांला टिळकांना वाहून नेण्याची परवानगी द्या' असे म्हणाले. 'जसे टिळक तुमचे तसेच ते आमचे मुसलमानांचेही आहेत' असें मुसलमान पुढारी म्हणूं लागले. त्या शोकसमयीं धर्मभेद कोणींच मानला नाहीं. जैन, मुसलमान, हिंदु सर्व टिळकप्रेत वहाण्याचा मान मिळवून स्वतःस धन्य मानूं लागले. मुसल- मान मोहोल्यांत टिळकांचें विमान येतांच मुसलमानी स्त्रियांनी त्यावर पुष्पवृष्टि केली. पुढे व्यापारी पेठेंतून विमान जाऊं लागले तेव्हां लो. टिळकांवरून व्यापाऱ्यांनीं चवल्या पावल्या उघळल्या. अशा प्रकारें पाऊस मी म्हणत होता तरी एकसारखे पांच तास या प्रचंड गर्दीसह ही अद्वितीय प्रेतयात्रा चालू राहून शेवटीं चौपाटीवर येऊन दाखल झाली. तेथें लाला लजपतरायांनीं लो. टिळकांस वंदन करून दोन शब्द सांगितले. नंतर एका थोर पारशी गृहस्थाने टिळक-भक्तीनें चंदनाचीं लांकडे पाठवून दिली. तेव्हां असल्या चंदनाच्या लांकडाच्या चितेवर प्रेतदहन केलें. अशा तऱ्हेची प्रचंड प्रेतयात्रा पूर्वी कधीही निघाली नव्हती. लो. टिळकांच्या मृत्यूमुळें मुंबई व पुणे येथील सर्व बाजार तीन दिवस बंद होते. बहुतेक देशांतील बहुतेक शाळा व कॉलेजें टिळकांच्या सन्मानार्थ बंद ठेवण्यांत आल्या होत्या. देशभर दुःखप्रदर्शनार्थ हजारों सभा भरल्या. यूरोप, अमेरिका, आफ्रिका वगैरे खंडांतही दुखवट्याच्या सभा भरल्या. बहुतेक गांवोगांव टिळकांचीं स्मारकें करण्याचे ठरविण्यांत आलें. सर्व हिंदु- स्थानचें एक मोठें स्मारक व्हावयाचेंही ठरलें आहे. व त्याकरितां एक कोटीपेक्षा अधिक रुपये जमले आहेत. लो. टिळकांच्या मरणानें