पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९९) दिवस रोगाशीं लोकमान्य झगडत होते. पण शेवटीं त्या दुष्ट का- ळानें रविवार ता. १ आगस्ट १९२० रोजी पहाटेस महाराष्ट्राचे पंच- प्राण हिंदभूमीचा सौभाग्यतिलक बाळ टिळक यांस हिरावून नेलें. ही बातमी उजाडण्यापूर्वीच देशभर पसरली. निरनिराळ्या शहरीं ही बातमी समजतांच थिएटरें खडाखड बंद झालीं, नाटकें जेथल्या तेथेंच थांचली व लोक डोळ्यांत अश्रू येऊन भराभर थिएटरांबाहेर पडले. पुण्याची मंडळी मिळेल त्या गाडीनें मुंबईकडे धांवली. शेवटीं जी. आय. पी. रेल्वेनें तीन स्पेशल गाड्या मुंबईकडे नेल्या तरी हजारों लोकांना जातां आलें नाहीं. प्रेसिडेंट आपटे व ना. परांजपे यांनीं 'टिळकांचें प्रेत पुण्यास नेऊं द्या' म्हणून शिकस्तीची विनंति केली. मोठाले शेट सावकार मोटारीनें घडाडत मुंबईला गेले व 'आमच्या टिळकांना आम्ही पुण्यास नेणार ' असा आग्रह धरून बसले. मुंबईकरही डोळ्यांत पाणी आणून 'आम्ही टिळकांना येथून जाऊं देत नाहीं' अर्से विनयकपूर्वक पण निश्चयानें म्हणूं लागले. त्यांना दुखविणें, आज दहा दिवस त्यांनी टिळकांसाठी खाल्लेल्या खस्ता व शेवटीं त्यांचा झालेला विरस मनांत न आणणें हेंही पुणेकरांना शक्य नव्हतें. शेवटीं तडजोड अशी काढली कों, टिळकांची पालखी उचलण्याचा पहिला मान पुणेकरांस द्यावा व मग मुंबईकरांनी ती पालखी आपल्या खांद्यावर घ्यावी. टिळकांची प्रेत- यात्रा प्रंचड निघणार व इतकी लाखों लोकांची गर्दी मुंबईच्या सोनापुरांत म्हणजे स्मशानांत मावर्णे अगींच अशक्य, ही गोष्ट मुंबईचे माजी नगराध्यक्ष वसंतराव दाभोळकर व इतरथोर गृहस्थ यांच्या पहाटेसच लक्ष्यांत आली, लगेच ते सरकारकडे गेले व गव्हर्नरसाहेबांनी सर्व गोष्टींचा विचार करून मुंबईत कधीच न घडलेली गोष्ट करण्याची स्पेशल परवानगी दिली. लो. टिळकांचें प्रेत समुद्रावर चौपाटीवर ज्या ठिकाणीं गणपति- विसर्जन होतें त्या ठिकाणी दहन करण्याची परवानगी मिळाली. टिळ- कांच्या प्रेतयात्रेला सर्व जातीचे, सर्व धर्माचे, हिंदू, मुसलमान, पारशी, यहूदी, जैन, वगैरे सुमारें चार लक्ष लोक जमले होते. सर्व रस्त्यांवरून या व