पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९८) केस समजावून देण्यासाठी व हवापालट करण्यासाठी ते मुंबईला गेले, व आपल्या प्रिय सरदारगृहांत जाऊन राहिले. नंतर त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन बॅ. जिना यांना केस समजावून सांगितली. त्या दिवशीं फार थकवा आल्यामुळे ते जरा मोटारींतून लांब फिरून आले. परत आल्यावर रात्रीं त्यांना ताप आला. दुसरे दिवशीं हायकोटीने आपल्यासारखा निकाल दिला है ऐकून त्यांना आनंद झाला. तरी ताप थोडा थोडा येत होताच. ही त्यांच्या आजारीपणाची बातमी हां हां म्हणतां सर्व देशभर पसरली. सर्व देश चिंतातुर होऊन सरदारगृहाकडे डोळे लावून बसला. मुंबईतील हजारों लोक त्यांची प्रकृति कशी आहे हें पहाण्यासाठीं बारान्- बारा चोवीस तास सरदारगृहाकडे जाऊं लागले. भाविक ब्राह्मणांनीं टिळक बरे व्हावे म्हणून देवावर अभिषेक सुरू केले, धनिक व्यापा- ज्यांनी टिळक बरे व्हावे म्हणून हजारों रुपये गोरगरीबांना धर्म केले. बाळांनो, तुमच्यासारख्या लहान लहान बाळकांनींही डोळ्यांत पाणी आणून 'देवा आमच्या टिळकांना बरें कर रे' अशी प्रार्थना केली. आर्य भगिनींनी देवाला नवस केले. दूरदूरच्या लोकांना कांहीं सुचेनासें झालें. तासातासानें 'आतां टिळक कसे आहेत' ? अशा चौक- शीच्या तारा येऊं लागल्या. मुंबईतील अत्यंत कुशल डाक्टर आपण होऊन आपले दवाखाने टाकून लो. टिळकांच्या उशापायथ्याशीं रात्रंदिवस बसून रोगाशीं झगडत होते. मोठ्या राजाचीही शुश्रूषा होणार नाहीं इतकी लो. टिळकांची शुश्रूषा होत होती. मधून मधून विद्वान वैद्याचार्य डाक्टरांना आपल्या मनाप्रमाणे कांहीं तरी सुचवीत होते. बाहेरगांवच्या हजारों तारा येऊन ' आतां टिळक जरा बरे आहेत ' असें धीर देणारें उत्तर पाठविण्याकरितां स्पशेल स्वयंसेवकांची नेम- णूक झाली होती. न्या. चंदावरकर, महात्मा गांधी, बॅ. बॅपटिस्टा, बॅ. जिना, वगैरे थोर लोक चिंताग्रस्त होऊन तेथे येऊन चौकशी करीतच होते. सर्व धर्माचे व सर्व जातीचे स्त्रीपुरुष सारखे सरदारगृहाकडे चालले होते. सर्व देशांचें मन लो. टिळकांकडे लागले होतें. सारखे दहा