पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९७) बाई टिळक हे नमुनेदार जोडपं होतें. या पतिपत्नींचें एकमेकांवर अतिशय प्रेम होतें. त्यांचे सर्व गोष्टींत व सर्व कार्यात अगदी एकमत असे. सुशील गृहिणी कशी असावी असे कोणीं विचारल्यास कै. सौ. सत्यभामाबाईसारखी असावी असें कोणीही म्हणेल. अशा सुशील, प्रेमळ व पतिनिष्ठ भार्येच्या संगतीचा लाभ बळवंतरावजींना जवळजवळ आपले वयाच्या ५५/५६ वर्षीपर्यंत मिळाला ही परमेश्वरी कृपाच सम- जली पाहिजे. कारण बळवंतरावांना या बाबतीत जरा भीतीच वाटत होती. कारण बळवंतरावांचे वडील गंगाधरपंत हे चांगले ज्योतिषी होते; त्यांनी बळवंतरावांच्या जन्माची वेळ बरोबर टिपून ठेवली होती व त्यावरून त्यांची पत्रिकाही तयार केली होती. ती पत्रिका पाहून गंगाधरपंतांनी म्हणजे बळवंतरावांच्या वडिलांनी त्यांना सांगितलें होतें कीं 'तुला द्विभार्या योग आहे. ' म्हणजे तुला दुसरी बायको करावी लागणार. पण ईश्वराला काय अशक्य आहे ? त्यानें बळवंतरावांना सर्व वेळ देशकार्याला देतां यावा व प्रपंचांतील कामांत त्यांचा वेळ जाऊं नये म्हणून त्यांच्या सुशील पत्नीचे आयुष्य वाढविलें. असो. बळवंतरावांचें प्रिय पत्र 'केसरी' याचा खप तें त्यांनी हाती घेतलें तेव्हां सुमारें ४००० होता. तो त्यांच्या दिव्य देशभक्तीच्या तपार्ने वेळो- वेळीं वाढत जाऊन आतां तो सुमारें ४० हजार झाला आहे असें ऐकतों. एवढ्या प्रती एका दिवसांत झपाझप छापतां याव्या म्हणून बळवंत-

  • रावांनी विलायतेहून येतांना एक प्रचंड शक्तीचें यंत्र आणले आहे व या

यंत्रावर 'केसरी' आठवड्यांतून दोनदां काढावा असा त्यांचा बेत होता. त्याप्रमाणें यंत्र आणून वाड्याच्या आवारांत त्या यंत्रासाठी नवी इमारतही बांधण्याचे काम सुरू केलें. पण मनुष्य योजित असतो एक, व दैवांत असतें दुसरेंच तसें झालें. १९२०च्या जून महिन्यापासून मधून मधून बळवंत- रावांना हिवताप येऊं लागला तरी त्यांचा कामाचा रगाडा चालूच होता. पुढे बाबामहाराजांच्या दत्तक प्रकरणांत हायकोर्टात कोल्हापूर सरकारच्या अर्जावरून काम चालावयाचें होतें म्हणून बॅ. जिना यांना ७