पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९६ ) यांनी स्वराज्यांचा पहिला हप्ता आपणास दिला ही बातमी त्यांना कळली. ती कळतांच मी माझे देशाचे तर्फे बादशाहांचे या थोर देणगी बद्दल आभार मानतों अशी तार त्यांनीं स्टेट सेक्रेटरीसाहेब व हिंदुस्तान सरकार यांचेकडे पाठविली. नंतर अमृतसर येथे गेल्यावर पंजाबी लोकांनीं अतीशय प्रेमानें त्यांची भव्य मिरवणूक काढली. त्यानंतर राष्ट्रीय सभेत उत्तम कामगिरी बजावून बळवंतराव परत पुण्यास आले. पुण्यास आल्यावर राष्ट्रीय कामगिरी बजावीत असतांना त्यांनीं एक संसा- रांतील कामगिरी बजावली. कोणती म्हणाल तर आपल्या मुलाचें लग्न. ओघानेंच आलें म्हणून या राष्ट्रीय पुरुषाच्या प्रपंचाची थोडीशी हकीगत येथें देतो. साधारण जगांत आपण असें रहातों कीं, मोठमोठाली कामें करणाऱ्या राष्ट्रीय थोर पुरुषांच्या गृहसौख्यांत कांहीं तरी उणेपणा असतो. त्यांना संततिसौख्य नसते किंवा अल्प असतें. उदाहरणार्थ; थोर देशभक्त न्या. रानडे यांना संततिसौख्य मुळींच लाभले नाही, तीच अवस्था विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची त्यांनाही संततिसौख्य नव्हतें. थोर भारतसेवक ना. गोखले यांना पुत्रलाभ झाला नाहीं; परंतु आपले बळवंतराव सर्व बाजूंनी यशस्वी होते. त्यांना तीन सुशील मुली व तीन सद्गुणी मुलगे झाले. त्यांच्या तीनही मुलींची लग्ने होऊन त्यांना सुशील व सुविद्य पति लाभले आहेत. त्यांचे वडील चिरंजीव १९०१ साली प्लेगनें वारले, हा एक दुःखाचा घाला त्यांचेवर आला. त्यांचे दुसरे चिरंजीव मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहेत द तिसरे चिर- जीव यांनी बी. ए. पर्यंत मजल मारली आहे. या दोन मुलांपैकी एकाचें लग्न बळवंतरावांच्या हातून झाले. बळवंतरावांना देशसेवा इतकी उत्तम बजावतां आली यांचें बरेंचसें श्रेय त्यांच्या सुशील, शांत, पतिनिष्ठ व गृहकार्यदक्ष पत्नी सौ. सत्यभामाबाई यांना दिले पाहिजे. त्यांनी घरची सर्व व्यवस्था उत्तम त-हेनें ठेवली व सर्व प्रपंचाचा कारभार स्वतः उत्तम तऱ्हेनें चालविला. यामुळेच बळवंतरावांना सर्व वेळ व सर्व लक्ष्य देशकार्याकडे लावतां आलें. बळवंतराव टिळक व सौ. सत्यभामा-