पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंत.] महाराष्ट्रकाव्यमकरंद, [९१ (८) शकसिल तरि यत्न करीं; पण होणारासि कोण परिहरितो ? (९) जिंकील काय खोटा बळकट मोगहि काक हंसातें? (१०) ज्याची जी वृत्ति असे त्याची ती देवता तिची सेवा; जे वाद सांगतिल ते सांगोत, भजों नये परा देवा. (११) ज्याच्या माथां बैसे काक तयाचींच लोचने फोडी. (१२) परकार्यार्थ तसा निजकार्यार्थ न उद्यमांत साधु निघे. (१३) (की) एकेंहि दिनकरें होतात द्युतिविहीन आवे शें. (१४) नीति असी की अबले प्रबलासि रणी कधी न हटकावे. दैवें विरोध घडतां बळहीने त्यजुनि मान सटकावे. (१५) नित्य उपद्रव होतां त्यजती पक्षीहि आपुल्या नीडा. (१६) वाढवित्यांतें न भजे धर्मज्ञहि कोण हो असा नष्ट? (१७) तापविलेंही पुनरपि शीतळ होतेंच की जडहि तोय. (१८) निश्चय हा आयु असे तो मरण नसेचि भीति सोडावी. (१९) ... भद्र न पावे कदापि हातनय. (२०) तो भाग्य प्राप्त परि प्रिय वाटेनाचि पामरा व्याही. (२१) न करावें परिणामी तापपद में मनास देहास. (२२) 1 ... प्रभुच्या आज्ञेपुढे उपाय नसे. (२३) न करितिच पाय धरतां करितां विज्ञापना वरद हानी. (२४) जनककुलाहुनि पतिकुल अधिक असावे असा वधूकाम. (२५) ... अनय कां मनीं न सले ?