पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९०] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [ मोरोपंत. ... भस्मी मोनासि काय हो टिकवे ? (५) ... अनृते कोणाचाही न लागला प्रांत. ... काय असे अदेय वरदासी ? (७) सुहृदर्पित अणुमात्रहि ते ब्रह्मांडापरीस करि थोर. नामरसायन. (१) दीन व्यसनी बुडतां ताराया साधुहात नावरिती. (२) येतील समर्थाच्या कार्यासि समर्थ; काय ते चित्र ? तो धन्य स्तवनोचित जो दीन जळासि दुग्ध सन्मित्र. (३) संत न अंत पहाती हाती असतां समर्थ भगवंत. (४) दवडाया दीनांची दुःखे सर्वस्व वैचिती संत. हरिवंश. (१) फल भोगविल्यावांचूनि कैसा गे दोष राहतो उगला. (२) मानधना घात यशोनाशी नच निजवधी. ... (३) अप्रियकारि जनाचा अणुमात्र धरूं नयेचि विश्वास. (४) जेथें विरोध तेथें न वसावें त्यजुनि नीतिची पदवी. (५) जीर्णाचे केश जिरति, जीर्णाचे जिरति सर्वही दंत; परि जीर्णाच्या जीवितधनवांछा ज्या तयां नसे अंत. ... सत्यक्तीं दैव कां नव्हे वक्र? (७) आर्तीच्या भीतांच्या देतातचि हाक शूर हाकेला. १, आश्चर्य.