पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रकाव्यमकरंद.. [ज्ञानदेव, (४७) उत्तमासी मस्तक । खालविजे. अध्याय १३. (४८) भूमीचे मार्दव । सांगे कोंभाची लवलव. (४९) केळी कापूर जाहाला। जेवि परिमळे जाणों आला । कां भिंगारी दीप ठेविला । बाहेरि फांके. (५०) घर मोडोनि केले । मांडव पुढे (५१)- आंग धुणें । कुंजराचें. (५२) बैल विकूनि गोठा। पुंस लावोनि बांधिजे गांठा. (५३) मुंगिये मेरु नोलांडवे । मशका सिंधु न तरवे. (५४) जे भुई बीज खोविलें । तेंचि वरी रुख जाहालें । तैसे इंद्रियद्वारां फांकलें । तें अंतरचि की. (५५) आवडे ते वृत्ति किरीटी । आधी मनौनीचि उठी । . मग ते वाचे दिठी । करांसि ये॥ वांचूनि मनींचि नाहीं । तें वाचेसि उमटेल काई । बीजेंवीण भुई। अंकुर असे ? (५६) समुद्री दाटें भरितें । तें समुद्रचि भरी तयांतें. (५७) पंडित धरूनि बाळाचा हात । वोळी लिही सुव्यक्त । आपणची. (५८) रत्न पारखियाच्या गांवीं । जाईल गंडकी तरी सोडावी । काश्मीरी न करावी । मिडगण तेथें. (५९) अंतर शुद्ध नसतां | बाहेरि कर्म तो सर्वथा। विटंबु गा..