पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जानदेव.] महाराष्ट्रकाव्यमकरंद, अध्याय १०. (३९) बीज आलिया मुठी । तरूचि आला होय. अध्यायः ११० (४०) भोग्य तें त्रिशुद्धी न चुके। आणि बुद्धिही होणारा सारिखी के. (४१) परिसाचा खडवाचि जोडला । की फोडूनि आह्मी गाडोरां घातला । कल्पतरू तोडोनि केला । कूप शेता. (४२) सख्याचे उद्धत । सखा साहे निवांत. म अध्याय १२. (४३) अभ्यासाचेनि बळे। एकां गति अंतराळें । व्याघ्र सर्प प्रांजळे । केले एकीं ॥ विष की आहारीं पडे । समुद्री पायवाट जोडे । एकी वाग्ब्रह्म थोकडें । अभ्यासें केलें ॥ ह्मणोनि अभ्यासासि कांहीं । सर्वथा दुष्कर नाही. (४४) खडकी जैसें वर्षलें । कां आगीमाजी पेरिलें. (४५) घरींचिया उजियेड करावा। पारखियां आंधार पाडावा। हे नेणेंचि गा पांडवा । दीप जैसा ॥ जो खांडावया घाव घाली । कां लावणी जयाने केली। दोघां एकचि साउली । वृक्ष दे जैसा ॥ नातरी इक्षुदंडु । पाळि तया गोडु। गाळि तया कडु । नोहेचि जेवीं.. (४६) पाउसे विणे न सुके । समुद्र जैसा.