पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंत.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [८३ (५) कळवावें वैद्याला दुःख, कुशल तोचि संहरायाला. (६) श्रीगुरुचें उतराई व्हाया नमनाविणे उपाय नसे. (७) ऐसें तेज कवण में ब्राह्मणतेजास दंडवेना तें. अनुशासन (१) तो काय जन जयाच्या धन्यत्वे हर्षली प्रसूं नाही ? (२) ... लज्जाकर जेविं परपटोपभोग परिटांचा. (३) ... गुणहि अगुण होय जो न दे तोष. ) अश्वमेधपर्वमा (१) रसिकें तैल न खावें मिळतां नव विपुल धेनुचें आज्य. (२) सासू करी उपेक्षा त्यागीना स्वविनयासि परि सून. (३) गोडी कळतां मधुर्ते जसि मासी वारितां बहु न सोडी. (४) रसिकपरीक्षेत जसें सरसत्वें घृत तसें न तेल टिके. (५) उपदेशासि मति जसी गीतासि मृगी तसीच वेधावी. (६) जो प्रभु अरक्षक तया घेऊनि सुतपसहाय शापावे. (७) कोपवश पुरुष निजतप शापुनि वेंची न कोप हा साधू. (८) भलत्यासि संशयाने प्रेमाचा भंग भार्गवा होतो. (९) विधि रक्षिना जया त्या कोण कुशल करिल वस्तुला जतन ? (१०) जेथें आकति तेथे वसति सुगुण ह्मणति कवि वृथा काय. (११) उघडील जी कपाट स्वर्गाचे ती जिवीं धरावि किली. १ माता. २ दुसन्याच्या वस्त्राचा उपभोग. ३ तूप.