पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंत.] महाराष्ट्रकाव्यमकरंद, [७९ (९) .. .. सिंधु शुक्तिगर्भी मौक्तिक उपजे नदीतही असती; पुष्कळ सिंप्या, परि ती त्याच्या उदरीं न मौक्तिकें वसती. (१०) .. .. .. .. होणारा पुढे न बळ चाले. (११) ईश्वरवरानुकूलें देवं होताति कामना पूर्ण (१२) शशमंडळांत कोल्हा ह्मणतो मी सिंह, वल्गना करितो... जोवरि न पाहिला गजमुक्ताफळकवळभक्षिता हरि तो. (१३) .. .. .गुणवद्गुण जाणे गुणवंत, अगुण नेणेची. प्रसवे तीच अभिज्ञा (शल्या) तैसी न वांझ वेणेची (१४) विध्यासि मेरु मेरुसि विध्यचि जाणे न अन्य नग नीच. (१५) .. .. .. .. भले भ्रमतां पथ दाविती खळाहि ती. (१६) निवडे निकटचि वर्णे दूरसमचि पद्म पुष्प पळसाचें. (१७) .. .. .. उपेक्षा व्यसनी अरिचीहि न करिती संत. (१८) पाहों नयेचि आंगी बळ असतां दीन जंतुचा अंत; ऐसें सत्पुरुष व्रत. .. ... ... (१९) धनदाचिही नसे मग अन्याची काय निस्पृहा परवा. (२०) दुष्ट परच्छिद्र जसें पाहे तैसें न आपुलें पाहे. (२१) जरि पापदेशवासी तरि न करी पाप सर्व जन कांहीं; नित्य खळांतचि असतां साधु खळांच्या गुणा शिकत नाही. पंकांत पद्म न मळे; काकांच्या दुर्गुणा शिके न पिक चंदन परगंध न घे; होय तृणामाजि तृणचि काय पिक. (२२) पंजररुद्ध व्याघ्राप्रति लोक विशंक मारितात खडे. १ कोकिल.