पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८] महाराष्ट्रकाव्यमकरंद, [मोरोपंत (२२) शूर भुजांनी क्षत्रिय, शब्दांनी विप्र, पार्थ चापानें; केवळ मनोरथांनी कर्णा ! तूं शूर न प्रतापाने. (२३) सोडावी प्राणाची प्रभुचीच प्रीति पूर्ण जोडावी. (२४) स्वजनपरित्राणाहुनि अन्य व्रत मत नसेचि आर्याला. (२५) सावध हो, बा व्यसनी पडतो साहस करून कोपरत. (२६) सोसे कुलजा मृत्यु न अयशाचा सोसवे चुना नाकी. (२७) सोडावें कुळजांहीं जीवित समरी, न शस्त्र सोडावे. मोडावे आप्नवचन अयश शरीरार्थ केवि जोडावे ? (२८) .. .. .. .. विफल जसे दुर्जनीं सदुपदेश. (२९) वीराशयासि वीरचि समजे, नुमजेचि न सम जो नीच. कर्णपर्व. (१) वर्षावर्षी जेविन वृद्धिक्षय सिंधु हेचि बुधरीति. (२) .. .. .. कवि शोकाब्धी धृतिप्लेवें तरती. (३) .. .. शुद्ध यशश्री कधी न वरि सोंगा. (४) कोठे कवणा आलें यश करितां कर्म आग्रहें खोटें ? (५) करुनिहि अतुल पराक्रम न वदति कांहींच शूर. .. .. (६) अवधीरणाचि करि तें मानधना दुःख ज्या नसे अवधी. (७) प्रभुसी वैरहि करितां दुष्टहि पावे प्रसिद्धिला लोकी. (८) .. .. श्राव्य स्तव्यहि रिपुगुणहि गुणज्ञमंडळी होतो. १ वृष्टी झाली अथवा न झाली तरी. २ धैर्य हीच कोणी नौका तिने. ३ तिरस्कार. ४ मर्यादा.