पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रकाव्यमकरंद. [ ज्ञानदेव, अध्यायः ८. (२८) मार्गामार्ग देखावे । साच लटिकें ओळखावें । हिताहित जाणावें । हिताचि लागी. अध्याय ९ . (२९) वक्ता तो वक्ता नोहे । श्रोतेनिविण, (३०) दूध पवित्र आणि गोड । पासी त्वचेचिया पदराआड । परि ते अव्हेरूनि गोचिड । अशुद्धचि सेवी. (३१) कमलकंदा आणि दर्दरी । नांदणक एकेचि घरीं । परि पराग सेविजे श्रमरीं। येरा चिखलचि उरे. (३२) दिठी वेधली कवळे । तैं चांदणियातें ह्मणे पिवळे. (३३) ज्वरे विटाळलें मुख । तें दुधातें ह्मणे कडू विख. (३४) स्वमींचे नि अमृतें । अमर नोहिजे. (३५) कोण्ही एक कांजी प्याला । मग परिणाम पाहों लागला । अमृताचा. (३६) कांकोंडा कांडितां सभटा । कण जोडे ? (३७) तंवचि वहाळ वोहळ। जंव न पवती गंगाजळ । मग होऊनि ठाकती केवळ । गंगारूप. कां खैरचंदनकाष्टें । हे विवंचना तंवचि घटे । जंव न घापती एकवटे । अग्निमाजी. (३८) जंव जंव बाळ बळिया वाढे । तंव तव भोजें नाचती कोंडे । आयुष्य निमाले आंतुलिये कडे। ते ग्लानाचि नाही.