पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४] महाराष्ट्रकाव्यमकरंद. मोरोपंत. भीष्मपर्व. (१) की गोष्पदी बुडावा लंघुनि रामार्णवा अगाधा त्या. (२) एक्या सदुक्तिने जी सुगति घडे ती न कोटि शिबिकांही. (३) करितां साधूच्छेद स्वोच्छेदचि होय हो यश न राहे. (४) कोण तयांतें मारिल ज्यांचे जगदीश परम तो कवच. (५) नखहि नको ज्या कार्या त्या काढावा कशास करवाल. (६) पावे न सूक्ति कुजनी हतभाग्य जनीहि सुरभि मानातें. (७) बुडती व्यसनी थोरहि होतां दुष्टां जनां पळ सहाय. (८) राहेल कसी कौस्तुभ-मणिपाशी माणिकांत झिगझिग जी. (९) व्यसनी तेज न सोडी कुलजहृदय पावकांत माणिकसें. (१०) वपु न बहुत पोषावें यशचि सदा खाय ज्या न कीनार्श. (११) व्हावे शस्त्रंचि रणीं वीरांचे गलित वपु न रोगानें. (१२) क्षुद्र नदी जसि धरिती न धरि तसा दुरभिमान सागर गा. द्रोणपर्व. (१) आत्माहि उपेक्षावा परि रक्षावाचि बोल संतांनी. (२) ... ... .. आपण लाउनि पोषनि तरून कापावा. (३) उपदेशासि न वळता कोणीही न शुभ लाभला मागे. (४) .. .. .. .. उरे धनलोभे प्रीति नीति न व्रीडा. १ तरवार, २ यम.