पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [ मोरोपंत. (९) करिती सर्वस्वाचें परि न यशाचें सुबुद्धि मातरें. (१०) चित्त प्रसन्न नसतां उपचाराग्रह नव्हेत जाचकसे. (११) खळदृदय शुन्य केवळ शून्य असें व्यर्थ कां नभा गावें. (१२) (विदुर ह्मणे ) जो आस्तिक, गुरु वेदोक्ती जयास विश्वास, मीपण ज्यासि न शिवले, तो पंडित मान्य होय विश्वास. दुर्लभ वस्तु न वांछी, न करी जो नष्टवस्तुचा शोक, आपत्तींत न मोहे, त्या पंडित ह्मणति जाणते लोक. विद्या नसोनि उद्धत धन नसतां जो उदारपण वाहे, अर्थासि नीच कर्मे जो संपादावयासि जन पाहे, नसतां लाभ यशाचा दाटूनि करी परार्थ जो यत्न, मित्रार्थी कपट करी,-तो साक्षात् मढजनशिरोरत्न. मित्रत्व दे अमित्रा, जो मित्रद्वेष दुष्टकर्म करो, तो मूर्ख असे ह्मणती पुरुषपरीक्षा कळे जयांसि बरी. (१३) त्या काय टंक भंगिल घनही भंगू शके न हीरा ज्या. (१४) दुःख परासि न द्यावें, सत्य वदावें, क्षमा न सोडावी; जोडावी कीर्ति असी कुलरीति तुम्ही कधी न मोडावी. (१५) .. .. दुरभिमान न बरा देइल धनपति करीहि खर्पर हा. (१६) अमवी श्रमवी मळवी पळवी सत्कीतिला दुराग्रह रे. सेव्य सदुपदेश सुधा- ग्रह असदुपदेश हा सुराग्रहरे ! (१७) .. .. .. न वळति ते ज्यांसि काळ करि पक्क. (१८) निजधर्माश्रित न बुड़े निजधर्मच्युत कधी न अधम तरे. १ खापर