पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंत .] महाराष्ट्रकाव्यमकरंद. (३०) ... .. .. ... .. सुज्ञांही ऐकतांचि डोलावें ऐसेंचि बोलणे जरि तरि पुरुषाने दहांत बोलावें. (३१) साहे विविधोपद्रव वाहे पृष्ठी चतुर्विधे भते; आहे उगीच, ( कर्णा) न कधी बोलोनि दाखवी भूतें. जाळी ज्वलन न बोले न वदेचि जरि प्रकाश करि तरणी. न वदोनि कुलज पुरुषहि आले स्वयशः प्रकाश करित रणी. (३२) सुत्दृदुक्ता हितकामें धनकामें जड ह्मणों नये परिसा. (३३) सदसि परिस्फुट शब्दचि कार्य कराया समर्थ सदसिपरी. (३४) अद्भुत कर्म करुनिही बा न वदति एकही वच नयज्ञ. (३५) अरिच्याहि सद्गुणांतें प्रेमें वाखाणितात सुज्ञानी.. खळ हो मग वर्णावा कां न जगन्मान्य शिष्य सुज्ञानी? उद्योगपर्व. (१) आले असे कपाळा की निंदुनि हंस वायसां गावें. (२) आले असे कपाळा की स्वभुजांशी स्वयेंच भांडावें. (३) आला कोप जन्हितन्हि न सोडिति सहज क्षमेसि सुरसिकते. (४) अन्यायें मेळविलें देते न करूनि वाणि हानि धन. (५) कोणीहि सदुपदेशामृत लवहि माशितां कधी न मरे. (६) कामें को लोभ नागविले अमित यांस जे भुलले. यांच्या कुदृष्टिपातें तेजस्वी पुरुष हीरही उलले. (७) केवळ हितोक्ति कृत्य। भासे त्या काळदृष्टि ज्या गांठी. (८) .. .. ... ... कोण करील सावधान मत्ताते ? १ सभेमध्ये. २ स्पष्ट. ३ तरवार.