पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंत.] महाराष्ट्रकाव्यमकरंद ७१] (४८) हंसी हंस बकी बक मिसळे; जन ओढितो स्वजातिकडे. (४९) हय्यंगवीन जैसे सुरसिक रसनेंपुढे न तेल टिके. (५०) हांसत कर्म करावें भोगावे रडत तेंचि परिणामी. (५१) होतें सद्धर्माच्या कासेला लागतां सदा शिव हो. (५२) लोकां महोत्सवप्रद तोचि सदा; त्यांसि पाडवा नलगे. (५३) न बुडविति न वा तारिति चित्रे बरवींहि आड-नावांची. (५४) धर्मन्याय त्यजितां तेजस्वीही तमी न रविहि तरे. (५५) धर्मासि करि वरि लवे मात्र शिरें दुष्ट अंतरीं न मनें. विराटपर्व. (१) झाले बहु, होतिल बहु, आहेतहि बहु; परंतु यासम हा. (२) खळदृट्य साधुवचने दुखवे न सुतप्त लोहशंकुशतें. (३) चुकतें भावि तरि सुखा सुज्ञ श्रीकांतदास कां मुकते? (४) तारुनि परासि तरती हरिजन. (५) टाकिति न बाह्यरंगे फळ नीरस ह्मणुनि निपुण पणसाचें. (६) दुःसह कामविकार स्त्रीरत्नास्तव सुरा नरा होती. (७) .. .. .. .. धीरा भुलवील काय तोकवच ? (८) धर्मन्यायोचित में तेंचि सुभाषण मनासि उद्धवं दे. (९) न करील कां पित्याची दुर्गतिची माउली सुरा माती. (१०) नेणें जनमन साक्षी विश्वाचा एक जाणतो शिव तें. १ लोणी. २ कल्याण. ३ आडांची. ४ नौकांची.५बाळकाचे भाषण.६हर्ष.