पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंत.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [६५ सभापर्व. (६९) अप्रिय परि पथ्य असे वक्ता श्रोताहि दुर्लभ स्पष्ट; बहु सुलभ प्रियवदते वाढविती चुकविती न ते कष्ट ? (७०) की समयीं न वदावी तरि मग केव्हां सदुक्ति बोलावी? (७१) किमपि न वदला बहुधा समयीं समयज्ञ मौन्यही धरितो. (७२) गीष्पति पुढे मिरवितो साक्षरता दाखवूनि गाबाळ. (७३) चार व्यसने मृगया स्त्री पान द्यूत यांत जो सक्त तो धर्मच्युत; तत्कृत सत्कृत न महाजनांत हे व्यक्त. (७४) ज्याचे आचरण जसे त्या तैसा फलद काळजीवा हो. (७५) ज्वरिता जसें ससित पय सद्वचन न दुर्जना तसें चव दे. (७६) देतो सभेत लघुता जो स्वविषयी बळेंचि बोल निघे. (७७) धरिति शिवेच्छे क्षत्रिय- जन जिंकाया परा शरालीला संत क्षमेसि धरिती. व्याघ्रवक-हरि-व्याळ-प्रभृतींचा जो समूह हानिकर त्याहूनि काम-कोप-प्रमुखांचा निपट दुष्ट हा निकर. बा सादर अभयाच्या तापस दानींच हानि करवि खरी धृतिला धुळींत नेउनि ताप सदा नीच हानिकर विखरी. जी शीर्ती गाधजळा सरिता शिरतां निवे करी तीत; निवतो प्रवेशतां जन सर्वहि तैसा विवेकरीतीत. १ बहस्पति २ विद्वत्ता. ३ कल्याण इच्छिणारे. ४ बाणांच्या पंक्तीला.५ लांडगे ६सिंह. ७ सर्प ८ थंड. ९ जिचे पाणी खोल आहे अशी. १० नदी.११ हत्ती.