पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रकाव्यमकरंद [ मोरोपंत, (५१) विद्वत्वे सधनवे तुल्ये लोकांत मान सख्यातें. झाले जीर्ण विसर जे कोण तया मंदनायका पुसतो. गतरंग सुगंध जुना पावे सन्मान काय कापुस तो? (५२) विस्तर भय दे नाही तरि काळाचेंहि भय नसे गातां. (५३) वरि गारसा हिरा, परि त्या कवचे तेज काय हो मळतें? (५४) व्हावें क्रचि धर्म्य-व्यवहारीं धरूं नयेचि भीड नतें. (५५) भलत्यासींच नृपसुते द्वंद्व करुनि शस्त्र यश न मळवावें. (५६) भूपसखा भूपाचा कवि कविचा धनिक तोचि धनिकाचा. (५७) निद्राभंग बरा परि न बरा आवश्यक क्रियालोप. (५८) न करुनि विचार वदतां पडतें शोकांतं मानस ख्यातें. (५९) संसर्गीही भोगिति दोषीच न दोष आपुले भोगी. (६०) सुज्ञे ताप सहावा द्यावा तापप्रदासिहि न ताप. (६१) साधु कृतोपद्रवही प्रतिकूळ न होति ते जनां तरुसे. (६२) सर्वस्व वेंचिलें परि एक भलेपण जगांत वांचविलें. (६३) सन्माणिक्य मणिपुढे गोमेदाचा फिका पडे रंग.. (६४) सर्वत्र जिष्णु गुरुसा त्या गुरुशिष्यांत एकमात्र उणें वृद्धत्व क्षत्रत्व त्यजुनि पहातां समान सर्व गुणें. (६५) .. .. .. .. .. .. सुविद्या नता न कां पावे. (६६) सुज्ञांसि झांकिलेही कळति गुणख्यात मृगमदासम जे. (६७) सेवि तया वृद्धाचे मंत्रित हित हित तसे न तरुणाचें. (६८) सर्पा अर्पावें जे विषपण येते तया पया सुरसा. १ सख्य. २ प्रसिद्धपणे. ३ अर्जुन.