पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [ मोरोपंत, (२३) देहेंचि खळ वळे हे तत्व प्राशुत दक्ष कानांहीं ( २३ अ.) .. .. .. .. दैव अन्यथा घडवी. (२४) दुर्जनसहवास सदा तापद हा काय नरक सामान्य ? होईल यासि दाटुनि मानधन प्राज्ञ नर कसा मान्य ? २५) दैव प्रसन्न नसतां वस्तुसकल भेदिल्याचि परि पळतें. (२६) (भूप म्हणे ) बाळ दिसे परि मतिने वृद्धसा, न बाळकसा; वय अल्प परि अनल्पज्ञान; ह्मणावा असाहि बाळ कसा ? (२७) ब्राह्मण कणसे खुपती तुमच्या नेत्रीं न सोसवे काढा; युक्तचि मरणाराला हितपरिणामहि न सोसवे काढा. (२८) बहुतप करिता तापस धन्य नव्हे धन्य करिल जो जतन. (२९) बापा कांट्यानेंचि प्राज्ञ सुखें काटितात कांटा की. (३०) ... .. ... ... ... असमंजसकर्म सन्मतिस खातें. (३१) अज्ञ मुलें कलह करिति, न वदावें तेंचि बोलुति स्वैर; तें चित्तांत धरुनियां प्राज्ञे पुरुषे करूं नये वर. (३२) असतां विधिकवच नव्हे काळाच्याही विनाश कुंतांनी (३३) आण तुझी जाण खरें केला निश्चय नव्हेचि हा लटिका. (३४) आर्य प्रसन्न होती नुसत्याहि हितोक्तिच्या उदारपणे. (३५) आहेत कोश हाती लोकांचे रंजवीन मन दाने. विश्ववशीकरणाचा व्यावा नलगेचि मंत्र धनदाने. (३६) आकळिला मृगमद जरि बहुयत्ने वास काय आकळतो ? १ भाल्यांनी.