पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ५७ रामदास.] महाराष्ट्रकाव्यमकरंद, (१२१) आळसें काम नासतें । हें तो प्रत्ययास येते। कष्टाकडे चुकवितें । हीन जन. (१२२) आधी कष्टाचे दुःख सोसिती । ते पुढे सुखाचें फळ भोगितो। आधी आळसे सुखावती । त्यासि पुढे दुःख. (१२३) जिहीं उदंड कष्ट केले । ते भाग्य भोगून ठेले। येर ते बोलतचि राहिले। करंटे जन. (१२४) काया बहुत कष्टावी । उत्कट कीर्ति उरवावी । चटक लावून सोडावी । कांही एक. (१२५) झिजल्यावांचून कीर्ति कैंची | मान्यता नव्हे की फुकाची। जिकडे तिकडे होते छी छी । अवलक्षणे. (१२६) जे जे काही आपणास ठावें । ते ते हळु हळु शिकवावें। शाहाणे करूनी सोडावें । सकळ जनां.