पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [ रामदास (१०७) लोकनिंद्य तें करूं नये. (१०८) कळल्याविण बोलूं नये । अनुमाने निश्चय करूं नये. (१०९) प्रयत्नेंविण राहों नये । आळस दृष्टीस आणू नये. (११०) ब्राह्मणाची मुख्य दीक्षा । मागितली पाहिजे भिक्षा । ओं भवती या पक्षा । रक्षिले पाहिजे. (१११) आवडीविण वक्तृत्व । कंटाळवाणे. (११२) एकाची कीर्ति एकापुढें । वर्णितां साहित्य न पड़े। ह्मणोनियां पवाडे । जेथील तेथें. (११३) श्रीहरि वांचून जे कळा । ते जाणावी अवकळा. (११४) अवगुण सोडितां जाती। उत्तम गुण अभ्यासितां येती। कुविद्या सांडूनि अभ्यासिती । शाहणे विद्या. (११५) मूर्खपण सांडितां जातें । शहाणपण शिकतां येतें। कारभार करितां उमजते । सकळ कांही. (११६) तने मर्ने झिजावें । तेणें भले ह्मणोन घ्यावें। उगेंचि कल्पितां सिणावें । वाउगे जनीं. (११७) दुसन्यास कष्टवितां कष्टावें । लागेल स्वयें. (११८) शाहणे करावे जन । पतित करावे पावन । सृष्टी मध्ये भगवद्भजन । बाढवावें. (११९) एक भरतें एक रितें । रिते मागुते भरतें। भरतें तेंहि रितें। काळांतरी. (१२०) कष्टेंविण फळ नाहीं । कप्टेंविण राज्य नाहीं । केल्याविण होत नाहीं । साध्य जनीं.