पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदास.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [५५ (९४) आपुल्याची ग्वाही देऊ नये। आपुली कीर्ति वर्णं नये । आपुलें आपण हांसूं नये । गोष्टी सांगोनी. (९५) बहुतेकांशी करूं नये । मैत्री कदा. ( ९६ ) अल्पधनें माजूं नये । मूर्खासि संबंध पाडूं नये । अंधारी हात घालू नये. (९७ ) भलते भरी भरूं नये । विचाराविण. (९८) सत्य मार्ग सोडूं नये । असत्य पंथें जाऊं नये । कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा. (९९) अपकीर्ति सांडावी । सत्कीर्ति वाढवावी । विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची. (१००) दोष ठेवी पुढिलांसी। तेंचि स्वयें आपणापासीं । ऐसे कळेना जयासी । तो एक पढतमूर्ख. (१०१) यथार्थ सांडूनि वचन । जो रक्षन बोले मन । ज्याचे जिणें पराधीन । तो एक पढतमूर्ख. (१०२) पेरिलें उगवतें । बोलण्यासारखें उत्तर येते। ____तरी मग कर्कश बोलावें तें। काय निमित्त ? (१०३) क्रियेविण शब्दज्ञान । तेंचि श्वानाचें वमन. (१०४) बोलण्यासारखे चालणे । स्वये करून बोलणें । तयांची वचनें प्रमाणे । मानिती जनीं. (१०५) जें जनासी मानेना । ते जनही मानीना. (१०६) नित्य नेम सांडूं नये । अभ्यास बुडों देऊं नये। परतंत्र होऊ नये। कांहीं केल्या.