पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उस्तरीय ५४] महाराष्ट्रकाव्यमकरंद, [ रामदास (८१) अतिवाद करूं नये । पोटी कपट धरूं नये। शोधिल्याविण करूं नये । कुळहीन कांता... (८२) विचारेंविण बोलू नये । मर्यादेविण हालं नये। विवेचनेंविण चालूं नये । कांही केल्या. (८३) प्रीतीविण रुसू नये । चोरासि ओळखी पुसूं नये । रात्री पंथ क्रमूं नये । एकाएकी. (८४) जनी आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडु नये। पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळी. (८५) वक्तयास खंडूं नये । ऐक्यतसि फोडूं नये । विद्याभ्यास सोडूं नये । काही केल्या. (८६) तोंडाळासि भांडूं नये । वाचाळासि तंडूं नये। संतसंग खंडू नये. (८७) केल्याविण सांगू नये । आपुला पराक्रम. (८८) चहाडी मनासि आणू नये । शोधल्याविण करूं नये । काये काही. (८९) सुखा अंग देऊं नये । प्रयत्न पुरुषं सांडूं नये। कष्ट करितां त्रासूं नये । निरंतर. (९०) कोणाचा उपकार घेऊ नये । घेतला तरी राखू नये. (९१) जाणारासी पुसूं नये । कोठे जातोसि ह्मणोनी. ९२) पराधीन होऊं नये । आपले ओझें घालूं नये । कोणाएकासी. (९३) हीनाचे ऋण घेऊं नये । ग्वाहीविण जाऊं नये । राजद्वारी