पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदास.] महाराष्ट्रकाव्यमकरंद, (७०) पुत्र कलत्र आणि दारा । इतुकाच मानूनियां थारा। विसरोन गेला ईश्वरा । तो० ( ७१ ) दुर्जनाचेनि बोलें । मर्यादा सांडोनि चाले। दिवसा झांकिले डोळे । तो.. (७२) आदरेंविण बोलणे । न पुसतां साक्ष देणें । निंद्य वस्तु अंगीकारणें । तो० (७३) उंच स्थानी जाऊनि बैसे । जो गोत्रजांसी विश्वासे । तो . (७४) दोघे बोलत असती जेथें। तिसरा जाऊन बैसे तेथें । डोई खाजवी दोहीं हातें ॥ तो० (७५)उदकामध्ये सांडी गुरळी । पायें पाय खांजोळी। सेवा करी हीन कुळीं । तो० (७६) परस्त्रीशी कलह करी। मूर्खाची संगत धरी। तो० (७७) कलह पाहत उभा राहे । सोडवीना कौतुक पाहे । खरे असतां खोटे साहे। तो एक मूर्ख. (७८) लक्ष्मी आलियावरी । जो मागील ओळखी नधरी।तो०. (७९) आपण वाचीना कधी । कोणासि वाचाया नेदी। पुस्तक बांधोनि ठेवी बंदी । तो० उत्तम लक्षणे. (८०) वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ ओळखिल्याविण खाऊं नये। सांपडली वस्तु घेऊं नये । एकाएकी.