पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५०] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [ रामदास. - (२७) परपीडेवरी नसावें । अंतःकरण. (२८) बोलतो खरें चालतो खरोत्यास मिळती लहान थोरें. (२९) जंबवरी चदन झिजेना । तंवबरी तो सुगंध कळेना। ___ चंदन आणि वृक्ष नाना । सगट होती. (३०) राजी राखावें सकळांला । कठिण आहे. (३१) पेरिलं ते उगवतें । उसणे द्यावे घ्यावे लागते। वन काटितां भंगते । परांतर. (३२) उत्तरा सारिखें आलें । प्रत्युत्तर. (३३) विद्या उदंडचि शिकला । प्रसंगमान चुकतचि गेला । मग तये विद्येला । कोण पुसे. (३४) श्वान बांधिले तरी मुंके । तैसा स्वार्थ मूळे थिंके। (३५) सन्मार्गे जगास मिळाला । ह्मणजे जगदीश वोळला. (३६) नाना ऋषी नानामतें। पाहों जातां असंख्याते. ( ३७ ) जो बहुतांचे बोली लागला । तो नेमस्त जाणावा बुडाला. (३८) बोलणे एक चालणे एक । त्याचे नांव हीन विवेक. (३९) मज नाहीं तुज साजेना । खात्यास न खाते देखों शकेना. (४०) व्युत्पन्न आणि वाद घेना। ऐसा थोडा. (४१) कीर्ति करून नाहीं मेले । ते उगेचि आले आणि गेले. (४२) जैसें बोलणे बोलावें । तैसेचि चालणे चालावें। तरी महंतलीला स्वभावें । अंगी बाणे. (४३) वर्तल्याविण बोलावे । ते शब्द मिथ्या. (४४) कीर्ति पाहूं जातां सुख नाहीं। सुख पाहतां कीर्ति नाही. १ तडफडतो.