पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदास.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [४९ (१२) बहु निवडितां निवडेना। एक निश्चय घडेना। शास्त्रं भांडती पडेना । निश्चय ठायीं. (१३) बहुत शास्त्रीं बहुत भेद । मतां मतांसि विरोध, (१४) अवघे आंधळेच मिळाले । तेथें डोळसाचे काय चाले ? (१५) भोळा भाव सिद्धीस जाव । हा उद्धाराचा उपाव. (१६) देउळावरी बैसला काक । तरी तो देवाहून अधिक। - ह्मणों नये. (१७ ) विचार पाहील तो पुरुषू । विचार न पाहे तो पशू. (१८) अंतरी रोग वरी उपचार। काय करी ? (१९) प्रपंची पाहिजे सुवर्ण । परमार्थी पंचीकरण. (२०) सारगार एकचि सरी । तेथें परीक्षेस कैंची उरी । या कारणे चतुरीं । परीक्षा करावी. (२१) देऊं नये तेंचि घ्यावें । घेऊं नये ते सांडावे. उंच नीच ओळखावें । या नांव ज्ञान. (२२) दोष देखोन झांकावे । अवगुण अखंड न बोलावे. (२३) अतिवाद न करावा । कोणी एकासी. (२४) दुःख दुसऱ्याचे जाणावें। ऐकोन तरी वांटोन व्यावें। बरे वाईट सोसावें । समुदायाचें. (२५) अपार असावें पाठांतर । सन्निध असावा विचार । सर्वदा सर्व तत्पर । परोपकारासी. (२६) जो बहुतांचे सोसीना । त्यास बहुत लोक मिळेना । बहुत सोसतां उरना । महत्व आपुलें.