पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदास.] महाराष्ट्र काव्यमकरंद. मूर्खाची लक्षणे. (४५) जन्मला जयाचे उदरीं । तयासी जो विरोध करी । सखी मानिली अंतुरी । तो एक मूर्ख. (४६) सांगे अंतरीची मात । तो० ... (४७) परस्त्रियेसी प्रेम धरी । श्वशुरगृहीं वास करी। कुळेविण कन्या वरी। तो० (४८) समर्थावरी अहंता । अंतरीं मानी समता। सामर्थ्यविण करी सत्ता । तो० (४९) आपली आपण करी स्तुति । स्वदेशी भोगी विपत्ति। सांगे वडिलांची कीर्ति । तो (५०) अकारण हास्य करी । विवेक सांगतां न धरी । जो बहुतांचा वैरी । तो. (५१) आपुली धरूनियां दूरी । पराव्यांसी मैत्री करी। परन्यून बोले रात्रीं । तो. (५२) बहुत जागते जन । तयांमध्येकरी शयन। परस्थळी बहुभोजन । करी तो० (५३) मान अथवा अपमान । स्वये करी परिच्छिन्न । तो० (५४) धरूनि परावी आस । प्रयत्न सांडी सावकाश। निसुगाईचा संतोष । मानी तो० (५५) घरी विवेक उमजे । आणि सभेमध्ये लाजे। शब्द बोलतां निर्बुजे । तो०