पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [ रामदास दासबोध. ओंव्या. (१) पूर्ण ग्रंथ पाहिल्यावीण । उगाच ठेवी जो दूषण । तो दुरात्मा दुरभिमान । मत्सर करी. (२) अभिमानें ये मत्सर । मत्सरें ये तिरस्कार । पुढें क्रोधाचा विचार । प्रबळ बळें. (३) जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा. (४) सुवर्णाचें लोह कांहीं । सर्वथा होणार नाही. (५)...कवीश्वर । शब्दसृष्टीचे ईश्वर • • कोहे शब्दरत्नांचेसागर । नानाबुद्धीचे वैरागर । की हे बोलके चिंतामणी।। ...की हे कल्पनेचे कल्पतरू की हे अमृताचे मेघ ओळले। की हे नवरसांचे वोघ लोटले...की ही विवेकनिधीची भांडोरें. (६) नरदेह हा स्वाधीन । सहसा नव्हे पराधीन ॥ परंतु हा परोपकारी झिजवून । कीर्तिरूपे उखावा. (७) गळ गिळितां सुख वाटे । ओढोनि घेतां घसा फाटे ॥ (८) आपण वचने बोलावी जैसीं । तैसी येतो पडसादें. (९) कोठे दिसेना कल्पतरु । उदंड शेराचा विस्तारु। पाहतां नाहीं मैलागरू । बोरी बाभळी उदंड. (१०) रायाचे सन्निध होतां । सहजचि लाभे श्रीमंतता। तैसा हा सत्संग धरितां । सद्वस्तु लाभे. (११) बहु ऋषी बहुमत । वेगळाले.