पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१७ रामदास.] महाराष्ट्रकाव्यमकरंद, (३०) जनीं सर्वसूखी असा कोण आहे । विचारी मना तूंचि शोधोनि पाहे. (३१) महाथोर ते मृत्युपंथेंचि गेले. (३२) मना मानसीं व्यर्थ चिंता वहातें। - अकस्मात होणार होऊनि जाते. (३३) मना सर्वथा सत्य सोडं नको रे। मना सर्वथा मिथ्य भांडूं नकोरे॥ मना सत्य तें सत्य वाचे वदावें। मना मिथ्य तें मिथ्य सांडूनि द्यावे. (३४) समर्थाचिया सेवका वक्र पाहे। असा सर्व भूमंडळी कोण आहे? (३५) जयाचेनि संगें समाधान भंगे। अहंता अकस्मात येऊनि लागे॥ तया संगतीची जनीं कोण गोडी (३६) घरीं कामधेनू पुढे ताक मागे. (३७) जनीं बोलण्यासारिखें चाल बापा. (३८) फुकाचे मुखीं बोलतां काय वेचे (३९) क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. (४०) विचारूनि बोले विवंचूनि चाले। तयाचेनि संतप्त तेहि निवालेबरें शोधल्यावीण बोलों नये हो।' जनीं बोलणें शुद्ध नेमस्त राहो. (४१) जया भावली भक्ति जे तेचि मोठय...