पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रकाव्यमकरंद [ रामदास (१८) कण सांडोनियां घेऊ नये भूस । गर्भविण फणस घेऊं नये ॥ घेऊं नये नारिकेळाची नरोटी। सालपटें खोटी डाळिंबाची॥ डाळिंबाची त्वचा चवड उसाचा । स्तंभ कर्दळीचा कामा नये. (१९) वाउगें सांडोनि सार तेंचि घ्यावें । येर तें सांडावें मिथ्या भूत. (२०) खोटें निवडितां खरे नाणे ठरे। (२१) दृश्यहि दिसेना अंधासि पहातां । परितया ज्ञाता ह्मणो नये ॥ वेगळेंची कळे क्षीर नीर हंसा। दास ह्मणे तैसा अनुभव. ६२२) दर्पणी पहातां दिसे सर्व अंग। परि पृष्ठ भाग आढळेना ॥ आपुलीच पाठी आपणा न दिसे। . (२३) अर्थाविण पाठ कासया करावें । व्यर्थचि मरावें घोकोनियां ॥ चोकूनियां काय वेगीं अर्थ पाहे । अर्थरूप राहें देखोनियां ॥ देखोनियाँ अर्थ साथेक करावे। (२४) एकदां जेवितां नवे समाधान। प्रतिदिनि अन्न खाणे लागे. ना, (२५) निरर्थक तीर्थे निरर्थकते। दास ह्मणे जेथे ज्ञान नाही. । (२६) सुखाचे संगति सर्वही मिळती।दुःख होतां जाती निघोनियां ॥ निघोनियां जाती संकटाचे वेळे । सुख होतां मिळे समुदाय. श्लोक.. (२७) जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्यते सर्व भावे करावें(२८) सदाचार हा थोर सोडूं नये तो। जगी तोचि तो मानवी धन्य होतो. (२९) देह त्यागितां कीर्ति मागें उरावी। मना सज्जना हेचि क्रीया धरावी.