पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदास.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. (१०) सारासार निवडावे । तैसें जाणोनीयां घ्यावे. (११). जीव जीवाचा आहार. (१२) बोला सारिखें चालणें। (१३) सेवकाचा साभिमान । समर्थाचें हैं लक्षण. (१४) चंदना संगति चंदनचि होती । होय काळी माती कस्तुरीका॥ कस्तुरीका होय कस्तुरीच्या योगें। साधुच्यानि संगें साधुजन, (१५) दुर्जन संगति कदां धरूं नये । घडती अपाये बहुविध ॥ बहुविध झाले अपाय बहुतां । तेंचि सांगों आतां सावकाशा कुसंग हे माया धरितां संगती । गेले अधोगती नेणो किती ।। चांडाळा संगती होईजे चांडाळ । होय पुण्यशीळ साधुसंगें ॥ कुरुंदा संगती झिजला चंदन । कुसंग जीवन नासतसे ॥ खाराचे संगती नासे मुक्ताफळ । होतसे तात्काळ कळाहीन ।। लाखेच्या संगती सोनें होय उणें । दुग्ध हैं लवणे नासतसे ।। दुर्जन संगती सज्जन ढांस । क्रोध हा प्रबळे अकस्मात ।। दास ह्मणे संग त्याग दुर्जनाचा । धरा सज्जनाचा आदरेंसी। (१६) जिवलग जीव घेती । तेथें परावे रक्षिती. (अ.१६) साधुसंगें साधु भोंदुसंगें भोंदु । वादुसंगें वादु होत असे॥ होत असे लाभ भल्याचे संगती ॥ जाय अधोगती दुष्टसंगें। दुष्टसंगें नष्ट झाला महापापी। होतसे निःपापी साधुसंगें । संग जया जैसा लाभ तया तैसा । होतसे आपैसा अनायासें. (१७) ताकहि पांढरे दुधही पांढरें। चवी जेवणारे जाणिजेते.