पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रकाव्यमकरंद, [रासदास. रामदास, अभंग. (१) सांभाळी तो काय प्रारब्धा वेगळें । होणार नटळे ब्रह्मा दोकां. (२) ज्ञानावीण सर्व व्यर्थचि जाणावें. (३) आह्मी पोगचे पाईक । आमां नलगे आणीक. आही खाऊं ज्याची रोटी। त्याची कीर्ती करूं मोठी. (४) आलें भगवंताच्या मना । तेथे कोणाचें चालेना. (५) रामदास ह्मणे भावें । जैसे द्यावे तैसें घ्यावे. (६) जैसा भाव असे जेथें । तैसा देव वसे तेथें. (७) कामधेन मोकलीली । घरीं गाढवी बांधिली ॥ उपडूनी कल्पतरू। केला शेराचा आदरू॥ सांडुनियां चिंतामणी । वेची धइवराचे पाणी ॥ गेले हातींचे निधान । केले कवडीचे साधन ॥ परिसा रागें हुंडारिला । हाती पाषाण घेतला ।। सार अमृत सांडिलें । दैन्य वाणे कांजी प्याले॥ सोने सांडुनी आदरें । वेचूं लागला खापरें । रत्न साहुनीयां खड़े । गेले ह्मणुन दुःखें रडे | केली साखर परती । सुखें तोंडी घाली माती. (८) कार्यकर्ता कीर्तिवंत । त्यासि जाणती समस्त ॥ कार्यकर्ता तो झांकना । वेध लावी विश्वजना. (९) कष्ट उदंड आटोपावें । तरि मग पुढे सुखी व्हावें.