पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

++ जनाबाई. नामदेव. महाराष्ट्रकाव्यमकरंद, मुक्ताबाई. जनाबाई. (१) गंगा गेली सिंधुपासीं । त्याणे अव्हेरिलें तिसी । तरि ते सांगावें कोणाला ? .. (२) ज्याचा सखा हरि । त्यावरि विश्व कृपाकरी. (३) चौरासंगतीने गेला । वाटे जातां नागवला. (४) अग्नीसवे खेळे । न जळला तरी पोळे. नामदेव. (१) देह जावो अथवा राहो । पांडुरंगी माझा भावो. (२) खेळखेळे परि डॉई न सांपडे।तो एक खेळिया शहाणारे. (३)-गुरुविण वर्म हाता नये. (४) मुखीं नाम हाती टाळी । (५) पितयाचे भाग्य पुत्रासी नये कदा. ____ मुक्ताबाई. (१) घरी कामधेनु, ताक मागू जाय। (२) परिसा झांकण घातले खापर । नाही झाले जाण बावनकशी. (३) अमृत गकोनि कांजीची आवडी। (४) खरासी अखंड गंगेचे हो स्नान । गेलें वाया जीवन. (५) उसाचे शेजारी एरंडाची झाडें । नाही त्याचे पाडें गोडी त्यांला. (६) दुःखाचे शेवटीं सुख आले भेटी । भेटलिया पाठीं तेंही गेले.