पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रकाव्यमकरंद. [ तुकाराम. म तुका ह्मणे काय सलपासी काज। फणसांतील बीज काढुनि घ्यावे. (३१२) आपणा कळेना आपले अवगुण । नि पुढिलाचे दोष गुण वाखाणिती. (३१३) आपटा संवदडचारा । दसऱ्याचा होय तुरा || मृत्तिकची ते घागरी। पाण्यासाठी बैसे शिरी. (३१४) जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे.. (३१५) वाचोनि पढोनि जाले शहाणे । ह्मण ती आह्मी संत। परनारी देखोनि त्यांचें । चंचळ जाले चित्त || टिळा टोपी घालुनि माळा । ह्मणती आह्मी साधु । दया धर्म चित्तीं नाहीं । ते जाणावे भोंदु ॥ कलियुगी घरोघरी । संत झाले फार । वीतभरी पोटासाठीं । हिंडती दारोदार.