पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुकाराम.] महाराष्ट्रकाव्यमकरंद, (३००) मृगाचिये अंगीं कस्तुरीचा वास असे ज्याचा त्यास नसे ठावा॥ भाग्यवंत घेती वेंचूनियां मोलें । भारवाही मेले वाहतां वोझें. (३०१) मुसळाचें धनु नव्हे हो सर्वथा। पाषाण पिळितां रस कैंचा। वांझे बाळा जैसें दुध नाहीं स्तनींगारात्या अधणी न शिजती. (३०२) समर्थासी नाही उपकार स्मरण । दिल्या आठवण वांचोनियां. (३०३) साकरेच्या गोण्या बैलाचिये पाठी । तयासी शेवटीं करबाडें । मालाचें मैं पेटे वाहताती उठे । तयालागी कांटे भक्षावया.) (३०४) सेवके करावे सांगितले काम ।सिक्याचा तो धर्म स्वामी राखे. (३०५) सर्प पोमूनियां दुधाचाही नास । केलें थिता विष अमृताचें. ३०६) सोइरे धाइरे दिल्या घेतल्याचे। अंत हे काळींचें नाहीं कोणी. (३०७) समुद्र हा पिता बंधु हा चंद्रमा। भगिनी ते रमा शखाचिया ॥ मेहुणा जयाचा द्वारकेचा हरि । शंख दारोदारी भीक मागे. (३०८) सिलंगणीचे सोने । त्यासी गाहाण ठेवि कोण. (३०९) सिंहा पुढे काय जंबूक आरोळी। मोतियांचे ओळी कांच काय? कापुरासि काय लावूनि उटावें । काय ओवाळावें दीपकासी ? (३१०) आंधळयाचे काही लागले आंधळे । घात एका वेळे पुढे मागे (३११) आपणा लागे काम वाण्याघरी गुळ । त्याचे याति कुळ काय कीजे ॥ उकरड्यावरी वाढली तुळसी। यकावी ते कैसी ठायागुणें ॥ गाईचा जो भक्ष अमंगळ खाय। तीचे दुध काय सेवू नये ॥