पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रकाव्यमकरंद. [तुकाराम, सुख पुराणी आचारशीला । दुःख वाटे अनर्गळा ॥ शूरा उल्हास अंगीं। गांढया मरण ते प्रसंगी । शुद्ध सोने उजळे आगी। हीन काळे धांवे रंगीं ॥ तुका ह्मणे तोचि हिरा । घनघायें निवडे पुरा. (२९२) पोटी शूळ अंगी उटी चंदनाची। आवडी सुखाचि कोण तया ॥ ज्वरिलिया पुढे वाढिली मिष्टान्ने।काय चवी तेणें व्यावी त्यांची. (२९३) प्रीति नाहीं राया वर्जिली ते कांता । परी तिची सत्ता जगावरी. (२९४)-प्रीतिविण भेटी रुचि नेदी। (२९५) पेरी कडू जिरें मागे अमृतफळे । अर्का वृक्षा केळे कैसी येती (२९६) पोहों नये कासे लावितो आणिका। ह्मणावें त्या मूर्खा काय आतां. (२९७) माक्तनाच्यायोगें आळशावरी गंगास्नान काय जगा करूं नये? उभी कामधेनु मांगाचे अंगणीं।तिसी काय ब्राह्मणी वंदूं नये? कोढियाचे हातें परिमें होय सोनें। अपवित्र ह्मणोन घेऊ नये? यातिहीन झाला गांवींचा मोकासोत्याच्या वचनासी मानूं नये? (२९८) पतिव्रतेची कीर्ती वाखाणितां । सिंदळीच्या माथां तिडिक उठे। आमुचे ते आहे सहज बोलणे । नाही विचारून केले कोणी ।। अंगें उणे त्याच्या बैसे टाळक्यांत। तेणें ठिणग्या बहुत गाळीतसे. (२९९) बरे झालियाचे अवघे सांगाती । वाईटाचे अंती कोणी नाही। नोहे मातापिता नोहे कांतासुत । इतरांची मात काय सांगो । तुका ह्मणे जन दुतोंडी सावज । सांपडे सहज तिकडे धरी.