पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [तुकाराम मोहरा होय तोचि अंगें। सूत न जळे ज्याचे संगें || तुका ह्मणे तोचि संत । सोसी जगाचे आघात. (२७२) होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं । तुका ह्मणे कुडें । कळों येते तें रोकडे, (२७३) हाती होन दावी बेना: करिती लेकीच्या धारणा. (२७४) हालवूनि खुंट । आधी करावा बळकट ॥ मग तयाच्या आधारें। करणे अवघेचि बरें. (२७५) हातीच्या कांकणा कायसा आरसा। (२७६) हिरा ठेवितां गाहाण। मोल न तुटे दुकाळी जाण. (२७७) क्षमाशस्त्र जया नराचिया हाती। दुष्ट तयाप्रति काय करी।। तण नाहीं तेथें पडिला दावाग्नि । जाय तो विझोनि आपसया. (२७८) ज्ञानभांडाराचे पोते। रिते नव्हें कल्पांती. (२७९) कामातुरा भय लाज ना विचार। शरीर असार तृणतुल्य. (२८०) कांही चिंतेविण । नाहीं उपजत सीण. (२८१) केला पण सांडी । ऐसीयासी ह्मणती लंडो. (२८२) काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बगाचें ॥ अंतरींची बुद्धि खोटी । भरलें पोटी वाईट || काय उंदीर नाहीं धांवीं। राख लावी गाढव ।। तुका ह्मणे सुसर जळीं । कावळी कां न न्हाती. (२८३) काजव्याच्या ज्योती । तुका ह्मणे नलगे वाती. (२८४) कस्तूरीचे रूप अति हीन वर । माजी असे सार मोल तया ॥