पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुकाराम.] महाराष्ट्रकाव्यमकरंद [३७ (२६०) सहज बोलणे हित उपदेश । (२६१) सांपडला संदीं। मग बळिया पडे बंदी || दाता मागे दान । जाय याचका शरण ॥ GO) (२६२) सर्प विंचू दिसे । धन अभाग्या कोळसे ॥ आला डोळ्यांसी कवळ । तेणे मळलें उजळ. CONS) (२६३) सोनियाचे ताट क्षीरीने भरिलें । भक्षावया दिले श्वानालागीं ॥ मुक्ताफळहार खरासि घातला।कस्तुरी सुकराला चोजविली ॥ वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खुण काय जाणे ॥ तुका ह्मणे ज्याचें तोचि एक जाणे. (२६४) साधूनी बचनाग खाती तोळा तोळा।आणिकां ते डोळां न पहावे. साधूनी भुजंग धरितील हातीं। आणिकें कांपती देखोनियां असाध्यतें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका ह्मणे. (२६५) मुख अंतरीचे बाह्य ठसठसी। (२६६) स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे।भाव दावी पिवळे लालसंगें. (२६७) समर्थाच्या नावें । भलतैसें विकावें. (२६८) सागरी थेंबुडा । पडिल्या निवडे कोण्या वाया. (२६९) सांडुनिया हिरा । कोणें वेंचाव्या त्या गारा. (२७०) सरिता मिळाली सागरीं । आणिकां नावा कैची उरी ॥ अनेक दीपींचा प्रकाश । सूर्य उगवतां नाश. (२७१) हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ॥ तोचि मोल पावेखरा । करणीचा होय चुरा॥