पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रकाव्यमकरंद. [ तुकाराम. (२४६) सोन्या सेजारी तो लाखेची जतनं । सतत ते गुण जैसे तैसे. (२४७) सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण। जोवरी हा प्राणजाय त्याचा] (२४८) समर्थाचे पोर्टी । आह्मी जन्मलों करंटी. (२४९) समर्थासी बोले कोण । (२५०) सिंचन करितां मूळ । वृक्ष ओलावे सकळ ॥ नको पृथकाचे भरी। पडों एक मूळ धरी॥ वश झाला राजा। मग आपुल्या त्या प्रजा. (२५१) सावित्रीचे विटंबण । रांडपण करीतसे ॥ काय जाळावें तें नांव । अवघे वाव असे ते ॥ कुबेर नांव मोळी वाहे । कैसी पाहें फजिती. (२५२) सकळ यातीमध्ये ठक हा सोनार । त्या घरी व्यापार झारियाचा. (२५३) सेवकें करावें स्वामीचे वचन । त्यासी हुतूंपण कामा नये. (२५४) संगतीने होतो पंगतीचा लाभ। (२५५) सेवकासी आज्ञा निरोपासी काम। स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे|| (२५६) सदां सर्व काळ अंतरीं कुटिल । तेणें गळां माळ घालूं नये ॥ ज्यासी नाहीं धर्म दया क्षमा शांतिातेणें अंगे विभूती लावू नये जयासी नकळे भक्तीचे महिमान । तेणें ब्रह्मज्ञान बोलों नये ।। ज्याचे मन नाही लागलें हातासी । तेणें प्रपंचासी यकू नय॥ तुका ह्मणे ज्यासी नाही हरिभक्ति । तेणें भगवे हाती धरू नयः (२५७) सुख पहातां जवा पाडें । दुःख पर्वताएवढे.. (२५८) सेवका स्वामीसाठी मान । त्याचे नाम त्याचें धन. (२५९) साखरेसी ह्मणतां धोंडा । तरी कां तोंडा न रुचे.