पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रकाव्यमकरंद. ज्ञानदेव. ज्ञानेश्वरी; अध्याय १. (१) मूळसिंचने सहजें । शाखापल्लव संतोषती. (२) नगरांतरी वसिजे । तरी नागरीच होईजे. (३) काय भानुतेजी खद्योता । शोभा आथी ? अध्याय २. (४) जेथींचिया कृपा लाहिजे वर । तेथेंचि मने व्यभिचार । तरी काय मी भस्मासुर ? (५) अमृतही विटे । की काळवशें वजही फुटे । परी मनोधर्म न लोटे। विकरविला ही. (६) सरितांतें सागरू।त्यजी केंवी ? (७) मातेच्या कोपी थोकलें । लेह आथी. (८) की औषधाचिया कडवटपणीं । जैसी अमृताची पुरवणी। ते आहाच न दिसे परि गुणी । प्रकट होय. (९) वरिखरी पालवी खुडिजे।आणि मुळी उदक घालिजे। तरी कैसेनि नाश निपजे । तया वृक्षा ? (१०) जो अमृतातें ठिठेवी । तो + कांजी न सेवो. १ काजव्याला. २ आहे. ३ गुप्त. ४ नाव.