पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. wwimmin प्राचीन महाराष्ट्र कवींचे ग्रंथ मी करमणुकीकरतां वाचीत असतां त्यांच्या पुष्कळ उक्ति मला स्मरणीय वाटल्या. ह्या उक्ति ह्मणजे व्यावहारिक ज्ञान व अनुभव यांचे कोठेच होत. व त्या ह्मणीवजा असून बोलण्यांत किंवा लिहिण्यांत सहज गुंफून देतां येण्यासारख्या आहेत. इंग्लिश वक्त्यांच्या भाषणांत व गद्य लेखकांच्या लेखांत प्रसंगवशात् इंग्लिश कवींच्या उक्ती कशा गोवून दिलेल्या असतात व त्यांच्यामुळे भाषेला सौंदर्य, जोर व आटपशीरपणा ही एकदम कशी प्राप्त होतात हे तज्ज्ञांस ठाऊक आहे. तसाच प्रकार मराठी भाषेत व्हावा, व तिला अलंकृत करण्याचे एक सुलभ साधन असावे, या हेतूने प्रस्तुत पुस्तक त्या भाषेची अभिवृद्धि इच्छिणारांस सादर केले आहे. ह्या उक्तीपैकी काही प्रचारांत आहेत. पण प्रचारांत येण्यास योग्य | अतून आलेल्या नाहीत अशांची संख्या फार मोठी आहे, हे पुस्तक प्रथमवाचनाचे फळ आहे. रत्नांच्या खाणीत शिरल्यावर जेवढ्या मण्यांची प्रभा सहज व अनायासे झळकली तेवढेच अगोदर वेंचून घेतले. हे जर रसिक व गुणज्ञ पारख्यांना पसंत पडले तर त्याच खाणीत पुनः प्रवेश करून व दुसऱ्या खाणीकडे वळून आणखी रत्ने हुडकून काढण्याचे श्रम करण्यास उमेद येईल. शि. सी.वा.