पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुकाराम.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [३५ (२३३) शेजारणीच्या गली रागें । कुतन्यांनी घर भरले मागे. १२३४) शुद्धबीजा पोटीं । फळे रसाळ गोमटी. (२३५) शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाहीं कोणा. (२३६) शूर तो तयासी बोलिजे जाणा । पाठीशी घालुनि राखे दीना. (२३७) शूकरासी विष्टा माने सावकास। मिष्टान्नाची त्यास काय गोडी।। श्वानासी भोजन दिले पंचामृत । तरी त्याचे चित्त हाडावरी॥ तुका ह्मणे सर्पा पाजिलीया क्षीर । वमितां विखार विष जालें. २३८) शृंगारिलें नाहीं तगों येतवरी । उमटे लौकरी जैसे तैसें. (२३९) शाहाणियां पुरे एकचि वचन । विशारती खुण तेचि त्यासी. (२४०) शूरां साजती हतियारें । गांढयां हांसतील पोरें. (२४१) श्वाना दिली सवे। पायां भोवते ते भोंवे ॥ जेवितां जवळी । येऊनियां पुच्छ घोळी. (२४२) शुद्ध कसूनि पाहावें । वरि रंगा न भुलावे. (२४३) शांतिखग हातीं । काळासी ते नागविती. (२४४) सोने दावी वरी तांबे तया पोटीं । खरियाचें सारी विकं पाहे॥ पारखी तो जाणे तयाचे जीवींचें। निवडी दोहींचे वेगळालें। क्षीरानीरा कैसे होय एकपण । स्वादी तोचि भिन्न भिन्न काढी. (२४५) सासूसाठी रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥ मैंद मुखींचा कोवळा । भाव अंतरीं निराळा ॥ जैसी वृंदावन कांती । उत्तम धरूं नये हाती ।। बक ध्यान धरी । सोंग करूनि मासे मारी॥ तुका ह्मणे सर्प डोले । तैसा कथेमाजी खुले.