पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [तुकाराम (२२२) लपविलें तें ही करें उमटे । (२२३) वैद्य वाचविती जीवा । तरी कोण ध्यातें देवा ॥ __नवसें कन्या पुत्र होती । तरी कां करणे लागे पती. (२२४) वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचाचि वाहो बहुतेक. (२२५) व्याघ्राचिये भुके वधावी ते गाय। याचें नांव काय पुण्य असे. (२२६) वसोनि थिल्लरीं । बेडुक सागरा धिक्कारी || नाहीं देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हांवा ॥ फुगतें काऊळे । ह्मणे मी राजहंसा आगळें ॥ गजाहूनि खर । ह्मणे चांगला मी फार ॥ मुलाम्याचे नाणें । तुका ह्मणे नव्हे सोने. (२२७) वाईयनें भले । होने दाविले चांगलें ॥ एका विण एका। कैचें मोल होतें फुका ॥ विषे दाविलें अमृत । कडू गोड घातें हित॥ काळिमेने ज्योती। दिवस कळों आला राती ॥ उंच निच गारा । हिरा परिस मोहरा ।। तुका ह्मणे भले । ऐसे नष्टांनी कळले ॥ (२२८) व्यालीचिये अंगी असती वेधना। तुका ह्मणे मना मन साक्ष॥ (२२९) वेठी धरिल्या दावी भाव । मागे पळायाचा पाव. (२३०) व्यालीचा कळवळा । जीव बहुत कोवळा. (२३१)-वैद्यासी ते भीड मरण रोग्या। (२३२) विद्या अल्प परी गर्व शिरोमणि। मजहुनी ज्ञानी कोण आहे।। अंगी भरला ताठा कोणातें मानिना...