पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुकाराम.] महाराष्ट्रकाव्यमकरंद, (२११) माता कापी गळा । तेथें कोण राखी बाळा ॥ नागवी धावणे। तेथे साह्य व्हावे कोणे ॥ राजा सर्व हरी । तेथे दुजा कोण वारीः (२१२) मुंगी होउनि साखर खावी।निज वस्तूची भेटी घ्यावी॥ वाळवंटी साखर पडे । गज येउनि काय रडे. (२१३) माकडा दिसती कंवटी नारळा। भोक्ता निराळा वरील सारी ।। एका रस एका तोंडी पडे माती। आपुलाले नेती विभाग ते ॥ सनियांसी क्षीर वाढिल्या ओकवी।भोगि त्या पोसवी धणीवरी॥ तुका ह्मणे भार वागविती मूर्ख । नेतील तें सार परीक्षक. (२१४) येथे द्यावे तैसे घ्यावें । थोडें परी निरें व्हावें. (२१५) युक्तीचे गौरव नसतां जिव्हाळा। सांचवणी जळा परी नाश. (२१६) राया रंका एकी सरी। (२१७) रासभ धुतला महा तीथीमाजी । नव्हे जैसा तेजी शामकर्ण॥ तेवीं खळा काय केला उपदेश । नव्हेचि मानस शुद्ध त्याचें ।। सासी पाजिलें शर्करा पीयूष । अंतरीचे विष जाऊं नेणे ॥ तुका ह्मणे श्वाना क्षिरीचे भोजन । सवेंचि वमन जेवीं तया. (२१८) रायाचिये घरीं भाग्यवंता मान । इतरां सामान्यां मान नाही. (२१९) रत्नाचा जोहारी रत्नचि पारखी। येर देखो देखी हाती घेती. (२२०) रोगिया मिष्टान्न मर्कटा चंदन । कागासी लेपन कर्पराचें ॥ निर्नासिका जैसा नावडे आरसा। मूर्खा लागी तैसा शास्त्रबोध, (२२१).. .. .. लोभ्या नावडती पोरें। पाहे रुक्याकडे । मग अवघे ओस पडे.