पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२] महाराष्ट्रकाव्यमकरंद [ तुकाराम. (१९९) मिरासीचें म्हूण सत । नाहीं देत पिक उणे. कर (२००) मांडे पुन्या मुखें सांगों जाणे मातातोंडी लाळ हात चोळी रिते. (२०१) मोहोऱ्याच्या संगें। सुत नव्हे आगी जोगें. (२०२) माप तैसी गोणो । तुका ह्मणे रिती दोन्ही. (२०३) मन गुंतलें लुलयां । जाय धांवोनि त्या ठाया ॥ मागे परतावी तो बळी । शूर एक भूमंडळी. (१०४) महरा ऐसी फळे नाहीं । आली कांहीं गळती ॥ पक्वदशे येती थोडीं । नास आढी वेचे तों. (२०५) मागों नेणे परी माय जाणे वर्मी बाळा नेदी श्रम पावों कांही. (२०६) मोहरी कांदा ऊंस । एक वाफा भिन्न रस. (२०७) मातेचा संकल्प व्हावा राजबिंडाकपाळींचा धोंडा' उभा ठाके. (२०८) मुंगीचिया घरा कोण जाय मूळ। देखोनियां गूळ धांव घाली ॥ याचकाविण काय खोळंबला दाता । तोचि धांवे हिता आपुलिया ॥ उदक अन्न काय ह्मणे मज खाये। भुकेला तो जाय चोजवीत || व्याधी पिडिला धांवे वैद्याचिया घरा। दुःखाच्या परिहारा आपुलीया. (२०९) मायें मोकलिलें कोठे जावे बाळें । आपुलिया बळें न वंचे तें. (२१०) मोलें घातले रडाया। नाहीं असुं आणि माया.