पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुकाराम.] महाराष्ट्रकाव्यमकरंद, (१८९) बोले तैसा चाले । त्याची बंदीन पाउलें ॥ अंगें झाडीन अंगण । त्याचे दासत्व करीन ॥ त्याचा होईन किंकर । उभा ठाकेन जोडोनि कर. (१९०) बाळ शेंबडे मातेसी । काय नावडे तियेसी. (१९१) भाडेकरी वाहे पाठीवरी भार। अंतरींचे सार लाभ नाही. (१९२) भोरप्याने सोंग पालटिलें वरी । बकध्यान धरी मत्स्य जैसें ॥ टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगी देखों नेदि जगीं फांसे जैसे॥ ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा। भीतरील फांसा कळों नेदी॥ खाटिक हा स्नेहवादे पशुपाळी । कापावया नळी तयासारी. (१९३) भुंकती ती द्यावी भुकों। आपण त्यांचे नये शिकों || भाविकांनी दुर्जनाचें। मानूं नये कांहीं साचें. (१९४) भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान । हे तो चाळवाचाळवी । केलें आपणचि जेवी. (१९५) भल्याचे दर्शन । तेथें शुभचि वचन. (१९६) भुकुंनिया सुने लागे हस्ती पार्टी। होऊनि हिंपुटी दुःख पावे ॥ काय त्या मशकें तयाचें करावें । आपुल्या स्वभावै पीडतसे ॥ मातले बोकड विटवी पंचानना । घेतले मरणा धरणें तें. (१९७) भगवे तरी श्वान सहज वेष त्याचाातेथें अनुभवाचा काय पंथ । वाढवुनी जा फिरे दाही दिशा । तरी जंबुवेषा सहज स्थिति। कोरोनियां भूमी करिती मी वास । तरी उंदरास काय वाणी।। तुका ह्मणे ऐसें कासया करावें । देहासीदंडावें वाउगेंचि ॥ (१९८) मन शुद्ध तया काय करिसी माळयामं डित सकळा भूषणांसी.